सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शाखेमध्ये व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते श्री. प्रदीप हरिभाऊ जोशी सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षक समाज विकास विद्यालय सागाव तालुका शिराळा यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचा उपयोग व्यवहारात कसा करावा हे सांगत गुरु शिष्य नाते हे काटकोनासारखे असावे म्हणजेच शिष्याने नेहमी गुरूंच्या समोर नम्र असावे असे स्पष्टीकरण दिले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनीनी ईशस्तवन गायिले, मान्यवरांच्या हस्ते व्यास प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी सहाय्यक शिक्षक एस. व्ही. यादव यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून मान्यवरांचे स्वागत ओळख करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जे. एस. वाडकर हे होते. यावेळी प्रणव कुंभार, सानिका माळी, पूजा काळुगडे, मधुरा कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना श्रीफळ, रुमाल, पेन देऊन नम्रता दाखवली.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक वाडकर सर यांनी विद्यार्थ्यांनी नम्रतेने कसे वागावे हे स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी पत्रकार प्रसाद इनामदार व पत्रकार बाळू जोशी यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी कुंभारने तर आभार श्रीमती एम. जी. बोरगे यांनी मांडले.
Check Also
गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …