उपाध्यक्षपदी शामबाला पाटील : दोन्ही निवडी बिनविरोध
निपाणी (वार्ता) : कोणत्याही शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी येत असतो व तो निधी शाळेच्या मुख्याध्यापकांनी व गावकरी मंडळींमधून एका व्यक्तीने सर्व कमिटी मेंबरला विश्वासात घेऊन शाळेची सुधारणा करण्यासाठी शाळा सुधारणा कमिटीची व्यवस्था शासनाने केलेली आहे. अशा तवंदी शाळेच्या शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी तवंदीचे संतोष पाटील (ठाकरे) यांची तर उपाध्यक्षपदी शामबाला पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडी बिनविरोध करण्याकरिता यरनाळ ग्रामपंचायतचे अध्यक्ष संजय पाटील, समाजसेवक बाबासाहेब पाटील (गोल्डन बाबा), माजी एसडीएमसी अध्यक्ष दत्तात्रय पाटील, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र गुरव, सागर गुरव, आनंदा पाटील यांनी परिश्रम घेतले. यानंतर नूतन पदाधिकार्यांचा सत्कार झाला.
सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष संतोष पाटील म्हणाले, माझ्या कार्यकाळामध्ये कोणताही दुजाभाव न होता शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब पाटील नुतन अध्यक्ष, उपाध्यक्षाना शुभेच्छा देऊन शाळेच्या विकासासाठी झटण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत विकास अधिकारी, ग्राम पंचायत उपाध्यक्षा मिनाक्षी सुतार, यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.