Saturday , October 19 2024
Breaking News

जांबोटीत संगीताचार्य विष्णू सडेकरांचा गुरुवंदनानिमित्त सत्कार

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील संगीताचार्य विष्णू सडेकर यांचा गुरुपोर्णिमेचे औचित्य साधून मणतुर्गे गावच्या बाल शिवाजी भजनी मंडळाच्यावतीने शाल, श्रीफळ, पानविडा देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या चरणाशी संगीत भजनाची बाल शिवाजी भजनी मंडळाच्या वतीने गुरूवंदना अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर गुरुजींना नेहमीच तबल्याची साथसंगत करत आलेले त्यांचे जांबोटीतील सहकारी विजय गुरव यांनाही सन्मानीत करण्यात आले.
ऐतिहासिक नाटक दशावतारी नाटक (पौराणिक) असोत अथवा संगीत नाटके ज्यांनी खानापूरच्या पश्चिम परिसरात फुलवली आणि अजूनही जीवंत ठेवली त्यात हलग्याचे इराप्पा काळाप्पा मादार असोत, गुंजीचे कै. वासुदेव दप्तरदार असोत अथवा जांबोटीचे विष्णू आप्पाजी सडेकर असोत यांनी पायीपायी चालत अथवा सायकल सवारी करत. तुटपुंज्या मानधनावर केलेली सेवा अनन्य साधारण होती. आज घडीला एखाद्या पश्चिमेकडील खेड्यात जर ही दशावतारी नाटके आपणास पहायला मिळत असतील तर ती या तिघांनाच समर्पित करावी लागतील.
तबला वाद्यात संगीत विशारद ही पदवी घेतल्याबद्दल शिक्षक एम. व्ही. चोर्लेकरांचा सडेकर कुटुंबियाच्या वतीने सन्मान करण्यात आला. हा तर दुग्ध शर्करा योग म्हणता येईल.
आशा लोप पाऊ लागलेल्या कला ज्यानी एकेकाळी आपल्या संसारावर तुळशीपत्र वाहून जपल्या. त्या थोर कलावंतांना सन्मानित करण्याची संकल्पना मणतुर्गेकरांच्या हृदयात जागली आहे. या सत्काराने संगीताचार्य विष्णू सडेकर गुरुजींचे डोळे पाणावले. या प्रसंगी सडेकर कुटुंबियांसमवेत संजीव वाटुपकर, भरत सडेकर, उत्कृष्ठ गायक सुराप्पा पाटील, फोंडू सुतार, विनायक देवलतकर, पांडुरंग गुरव, महेश सडेकर, नारायण इंगळे, बाळकृष्ण जांबोटकर, तुकाराम सडेकर, पांडुरंग सडेकर पंच, शाहू काजूनेकर, श्रीपाद गुंजीकर, वैष्णवी सडेकर, रविंद्र गुरव, वैभव परमेकर, राजू सडेकर, सुभद्रा इंगळे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर येथे उद्यापासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

Spread the love  बेळगाव : तोपीनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *