मूर्ती स्थापनेसह विविध कार्यक्रम : दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी
निपाणी (वार्ता) : शहर परिसरात नाग पंचमी विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरी झाली. पूजा, झोपाळा खेळणे, नागपंचमीची गाणी, महाप्रसाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथे नागोबा गल्लीतील श्रीमंत सिद्धूजीराजे निपाणकर सरकार यांनी स्थापन केलेल्या नागोबा मंदिरामध्ये नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी कुंभार गल्ली येथे बनवलेल्या नागोबाची मुर्तीची पूजा श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते करून कुंभाराला मानाचे नारळ व विडा देऊन श्रीनागोबाची मूर्ती कुंभार यांच्या घरापासून वाजत गाजत गावातील प्रमुख मार्गावरून नागोबा गल्ली येथे आणण्यात आली. त्यानंतर मंदिरामध्ये मूर्तीचे श्रीमंत दादाराजे निपाणीकर व श्रीमंत सम्राजलक्ष्मीराजे निपाणकर दाम्पत्याच्या हस्ते विधिपूर्वक प्राण प्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली.
यावेळी परिसरातील शहर व परिसरातील भक्तांनी मनोभावे नागोबा देवाचे पूजा करून आशीर्वाद घेतला. नागोबा मित्र मंडळ्याच्या वतीने प्रसाद वाटप झाला. सायंकाळी या मूर्तीचे विधीपूर्वक अंमलझरी तळ्यामध्ये विसर्जन करण्यात आले. यावेळी श्रीमंत विजयराजे निपाणकर, श्रीमंत युवराज सिद्धूजीराजे निपाणकर, नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा, नगरसेवक सद्दाम नगारजी, उदय नाईक, दत्तात्रय जोत्रे, मंडळाचे अध्यक्ष महेश खोत, उपाध्यक्ष मनोज शिंदे तसेच सुनिल मोरे, रमेश परिट, अमोल देवडकर, किरण शिंदे यांच्यासह सदस्य व भाविक उपस्थित होते.