Saturday , October 19 2024
Breaking News

सलग सव्वा तास स्ट्रेचिंग करून सैनिकांना मानवंदना!

Spread the love

 

सद्गुरू तायक्वांदो अकादमीचा अनोखा उपक्रम: विद्यार्थ्यांना वाटली भगवद्गीता
निपाणी (वार्ता) : अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील श्री वेंकटेश मंदिरमध्ये सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांना मानवंदन म्हणून 1 तास पंधरा 15 मिनिटे न थांबता स्ट्रेचिंग केले. सैनिकांना व भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांसाठी हा अनोखा उपक्रम राबविला.
तायक्वांदो या प्रकारामध्ये स्ट्रेचिंगचा कर्नाटक राज्यातील पहिलाच उपक्रम निपाणी येथे घेण्यात आल्याने या अकादमीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्ट्रेचिंग उपक्रमात शार्विन भिकणावर, नूतन मोहिते, श्रेया मोहिते, आराध्या ज्वारे, सावी गुजर, अनिकेत ज्वारे, आदित्य ज्वारे, समर्थ निर्मले, कार्तिक चव्हाण यांनी खुर्चीवर बसून 75 मिनिट स्ट्रेचिंग केले. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. सुषमा बेंद्रे, श्रीराम सेना कर्नाटकचे अमोल चेंडके, डॉ. विवेक सोलापूरकर, हर्षद कदम, डॉ. सावित्री खोत उपस्थित होते. सुषमा बेंद्रे म्हणाल्या आज जो उपक्रम झाला त्याचा संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटतो. देशासाठी जे लढत आहेत. जे हुतात्मा झाले त्यांना मानवंदन म्हणून चिमुकल्यांनी स्वतःच्या शरीराला तान देऊन देशासाठी 75 मिनिट खुर्चीवर बसून स्ट्रेचिंग केले. ही कौतुकाची बाब आहे.
डॉ. विवेक सोलापूरकर यांनी,सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्य नेहमीच राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून कार्य करत आहेत. हे खरोखर कौतुकास्पद आहे. मुलांनी कम्प्युटर व मोबाईलच्या युगातून बाहेर पडून शारीरिक मानसिक सुदृढ राहण्यासाठी तायक्वांदो सारखे खेळ आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
अमोल चेंडके यांनी, तायक्वांदो क्रीडा प्रकाराबरोबर मुलांना जंगल ट्रेकिंग, पोहणे, देव, देश, धर्म, याबद्दल संस्कार आवश्यक असल्याचे सांगितले. स्ट्रेचिंग करून कार्यक्रम यशस्वी करणार्‍या मुला-मुलींना सुषमा बेंद्रे यांच्याकडून भगवद्गीता भेट स्वरूपात देण्यात आली तर अमित गुजर यांच्याकडून खाऊचे वाटप झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निरीक्षक म्हणून श्रीनिकेतन शाळेच्या शिक्षिका दिपाली कांबळे, पूजा मोहिते, अनुष्का चव्हाण, ओमकार अलकणुरे, देवदत्त मल्हाडे, गणेश हुल्कंती यांनी काम पाहिले. प्रशिक्षक बबन निर्मले यांनी करताना येणार्‍या काही दिवसातच जागतिक रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न अकॅडमी मार्फत करणार असल्याचे सांगितले. प्रथमेश भोसले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *