Thursday , June 4 2026
Breaking News

खेळातून सांघिक भावना निर्माण होते : क्रीडा शिक्षणाधिकारी जोगळे

Spread the love

 

कुर्ली हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा
निपाणी (वार्ता) : खेळ खेळत असतांना मनात खिलाडूवृत्ती हवी. खेळाडूंमध्ये सामना जींकण्याचे ध्येय हवे. त्यातूनच त्यांच्यात सांघिक भावना निर्माण होते. ही सांघिक भावना अबाधित ठेवण्याचे काम खेळाडू करीत असतात, असे मत चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा क्रिडा शिक्षणाधिकारी एस. बी. जोगळे यांनी व्यक्त केले. ते कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने आयोजित तालुका पातळीवरील थ्रोबॉल व व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन सदस्य सुभाष निकाडे होते.
एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले. एस. व्ही. बुरलट्टी यांनी क्रिडा प्रतिज्ञा दिली. एस. बी. जोगळे व मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. सुभाष निकाडे यांनी बौद्धिक विकासाबरोबर शारिरीक विकासासाठी क्रिडा स्पर्धा आवश्यक असल्याचे सांगितले. या स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक गटात 67 संघांनी भाग घेतला होता.
यामध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पुढील प्रमाणे-प्राथमिक गट-थ्रोबॉल, मुले-आयपीएस कोगनोळी, एमबीएस कुर्ली,
मुली-के आर एस हंचीनाळ व के एल ई निपाणी. प्राथमिक गट-व्हॉलीबॉल मुले- एम बी एस कुर्ली व एम बी एस भोज. मुली-के आर एस हंचीनाळ व साई कॉन्व्हेंट स्कूल मांगुर.
माध्यमिक गट-थ्रोबॉल मुले-सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली व बेडकिहाळ हायस्कूल बेडकिहाळ. मुली-सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली व बेडकिहाळ हायस्कूल बेडकिहाळ.
माध्यमिक गट-व्हॉलीबॉल मुले-सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली व न्यू इंग्लिश स्कूल सौदलगा मुली-जीएच एस कुनूर व व्ही मराठा मंडळ गर्ल्स स्कूल अक्कोळ यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. त्यांना मान्यवरांचे हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. पीएचसी सेंटर सौंदलगा यांच्यामार्फत आरोग्य सेवा पुरविण्यात आली.
यावेळी बी. एस. पाटील, तानाजी पाटील, शशिकांत पोवार, शिवाजी चौगुले, अशोक माने, संतोष पाटील, राजेंद्र चौगुले, एम. एच. कटगेरी, जे. एस. माळी, सुरेश ढगे, यांच्यासह निपाणी रेंज मधील क्रीडाशिक्षक व खेळाडू उपस्थित होते. एस. एस. साळवी व डी. डी. हाळवणकर यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.

 

About Belgaum Varta

Check Also

मेजर प्रा. डॉ. अशोक डोनर यांची देवचंद कॉलेजच्या उपप्राचार्यपदी निवड

Spread the love    निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद कनिष्ठ महाविद्यालयातील जीवशास्त्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *