Monday , December 23 2024
Breaking News

निपाणीत रिंगण सोहळ्याची तयारी पूर्णत्वाकडे

Spread the love

 

श्रीमंत दादाराजे देसाई सरकार : रविवारी होणार सोहळा
निपाणी (वार्ता) : शहर व परिसरासाठी प्रथमच भव्य प्रमाणात होत असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अश्वाच्या गोल व उभे रिंगण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. येथील म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर रविवारी (ता.28) होणार्‍या या सोहळ्यात शहर व परिसरातील 50 हून अधिक वारकरी मंडळ सहभागी होणार आहेत. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार यांनी केले.
येथील सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
श्रीमंत दादाराजे म्हणाले, रविवारी (ता.28) सकाळी 10 वाजता अंकलीकर सरकार यांच्या मानाच्या अश्वाचे आगमन निपाणकर वाड्यात होणार आहे. यानंतर अश्वांची पाद्यपूजा होऊन दिंडी चाटे मार्केट, कन्या शाळा, बेळगाव नाकामार्गे म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर जाणार आहे. या मैदानावर दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत गोल रिंगण व राम मंदिर ते सटवाई रोड कॉर्नर या मार्गावरून उभे रिंगण सोहळा होणार आहे.
येथून सटवाई रोड, दलाल पेठ, तानाजी चौकमार्गे माऊलींचे अश्व निपाणकर वाड्यात आल्यानंतर सोहळ्याची सांगता होणार आहे. यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी वाहनांची पार्किंग व्यवस्था म्युनिसिपल हायस्कूलच्या पाठीमागील बाजूस करण्यात आली आहे. विठू माऊलींचा गजर तसेच नव्या पिढीला संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी हा रिंगण सोहळा आयोजित करण्यात आल्याचे दादाराजे यांनी सांगितले.
यावेळी श्रीमंत विजयराजे देसाई सरकार, रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला, शरदराजे देसाई निपाणकर सरकार, राजेशराजे, देसाई निपाणकर सरकार, सुधाकर कुराडे, प्रकाश मोहिते, सुजित गायकवाड, गोपाळ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रा. भारत पाटील यांनी आभार मानले.
——————————–
व्हाईट आर्मीसह स्वयंसेवक
शहरात प्रथमच मोठ्या प्रमाणावर माऊलीचा रिंगण सोहळा होत आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील वारकरी व भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर व्हाईट आर्मी, अनिरुद्ध उपासना केंद्र, कणगला येथील येथील मावळा ग्रुप, व्हीएसएमएस स्वयंसेवक, देवचंद महाविद्यालयातील एनएसएसचे स्वयंसेवक, केएलई महाविद्यालयातील कॅडेट, वीरभद्रेश्वर मंडळाचे कार्यकर्ते शिस्तीसाठी सहकार्य करणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे

Spread the love  राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *