Saturday , September 21 2024
Breaking News

उदय उत्सव कार्यक्रम : अनेक मान्यवरांची उपस्थिती

Spread the love

 

बेळगाव : दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी बेळगांवमधील जिरगे भवन येथे उदय चैनल यांच्यावतीने सेवंती व जजनी धारावाही अभिनेत्यांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उदय उत्सवमध्ये भाग घेतलेल्या बेळगाव जिल्ह्यातील महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेमध्ये बेळगांवमधील स्पेशल स्नॅक्स बनवणे, कापडी बॅग तयार करणे, आरतीचे ताट सजविणे, रांगोळी स्पर्धा तसेच इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
उदय उत्सव कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी म्हणून खासदार मंगला सुरेश अंगडी व आमदार अनिल बेनके यांनी भाग घेऊन स्पर्धेमध्ये विजेत्या झालेल्या महिलांना बक्षिस वितरण केले. त्यानंतर सेवंती व जजनी धारावाही अभिनेत्यांना तसेच उदय टी व्ही चैनलला शुभेच्छा दिल्या.
या संदर्भात उदय टी व्ही व्यवस्थापक वैद्य, कार्यक्रमाचे आयोजक विणा नागमोती, नगरसेवक राजशेखर डोणी, मुरगेंद्रगौडा पाटील, भैरगौडा पाटील, सुजाता मत्तीकट्टी, शारदा पाटील व शेकडो संख्येने महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रमाची आवश्यकता : वाय. पी. नाईक

Spread the love  बिजगर्णी…(बेळगाव) : विद्यार्थी दशेत आपल्याला कोण व्हायचे आहे ते निश्चित करणं गरजेचं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *