Sunday , September 20 2026
Breaking News

महाविकास आघाडीची जवळपास 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण!

Spread the love

 

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधी महाविकास आघाडीची जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे. कारण जवळपास 80 टक्के जागांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपासाठी गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे याआधीदेखील मविआ नेत्यांची जागावाटपासाठी चर्चा पार पडली आहे. पण दोन दिवसांपासून सुरु असलेल्या बैठका या जागावाटपाबाबत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये विधानसभेच्या अनेक जागांवर सहमती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महाविकास आघाडीची जवळपास 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांची आतापर्यंत 120 ते 130 जागांवर सहमती झाल्याची माहिती समोर येत आहे. मविआ नेते तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तिढा असलेल्या जागांचा प्रश्न कसा सुटणार?
जागावाटपात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जो पक्ष ज्या जागा जिंकला, त्या जागा त्याच पक्षाला देण्याचा प्रयत्न आहे. जिंकलेल्या जागांमध्ये 10 ते 20 टक्के बदल केला जाणार आहे. मविआच्या जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील जागांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, तिढा असलेल्या जागांवर कोणत्या पक्षाची ताकद जाणून हे जाणून घेतले जाणार आहे. त्यानुसार मेटीवर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *