Saturday , September 21 2024
Breaking News

तेलंगणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन!

Spread the love

 

कोल्हापूर – तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना एका पंथाच्या श्रद्धा दुखावल्याप्रकरणी अटक झाल्यावर न्यायालयाने जामीन दिला होता; मात्र जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगणातील के.सी.आर. सरकारने त्यांना जुन्या प्रकरणात जाणीवपूर्वक अटक करून त्रास देण्याचा प्रकार चालवला आहे. एकूणच तेलंगणा सरकारची कृती ही पक्षपाती तथा संविधानविरोधी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करत आमदार टी. राजासिंह यांना संवैधानिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी त्यांची मुक्तता करावी, या मागणीसाठी कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 19 सप्टेंबरला हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आले. आंदोलनांतर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार संतोष कणसे यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, श्री. शिवानंद स्वामी, श्री. शशांक सोनवणे, विश्‍व हिंदु परिषेदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, शिवशाही फाऊंडेशनचे श्री. सुनील सामंत, हिंदुत्वनिष्ठ श्री. कृष्णात पवार, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदू महासभेचे श्री. मनोहर सोरप आणि श्री. जयवंत निर्मळ, बजरंग दलाचे श्री. पराग फडणीस, धर्मप्रेमी सर्वश्री संदीप चौगुले, किरण हंगे, बंडा पाटील, अभय शिंदे उपस्थित होते.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे म्हणाले, ‘‘टी. राजासिंह यांच्यावर ‘पी.डी. ऍक्ट’अंतर्गत त्यांना किमान एक वर्ष तुरुंगात ठेवण्याचा भयंकर कट रचण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यापूर्वी आणि अटक केल्यानंतर जिहादी प्रवृत्तीच्या धर्मांधांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच ‘सर तन से जुदा’सारख्या प्रक्षोभक आणि जीवे मारण्याच्या घोषणा देत हिंसक आंदोलने केली गेली. एकूणच टी. राजासिंह यांना तेलंगाणा सरकारकडून न्याय मिळेल, अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे त्यांच्यावरील सर्व खटले महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा गोवा या बाजूच्या राज्यांत हस्तांरित करावेत. त्यांना जिहादींकडून धोका असल्यामुळे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे. तसेच त्यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्यावर संभाव्य आक्रमणाची शक्यता लक्षात घेता त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्यात यावी.’’
याच मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवात प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या संकल्पना राबवू नयेत

Spread the love हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर महापालिका आयुक्तांना निवेदन कोल्हापूर : प्रदूषण नियंत्रण मंडळाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *