नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो यांना मोठा धक्का देत सामूहिक बलात्कार करणार्यांच्या सुटकेविरोधातील याचिका फेटाळली आहे. 2002 साली गोध्रा दंगलीवेळी बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, तसेच त्यांच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणार्या 11 आरोपींची गुजरात सरकारने सुटका केली होती.
या आधी बिल्किस बानो यांच्या या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर बिल्किस बानो यांच्या वकील शोभा गुप्ता यांची केलेल्या विनंतीनंतर या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.
एका न्यायाधीशांची या प्रकरणातून माघार
बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणार्या न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांनी माघार घेतली होती. त्यामुळे सुरुवातीला या याचिकेवरील सुनावणी स्थगित करण्यात आली होती. आता ही याचिका फेटाळण्यात आली आहे.