बेळगाव : जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान असलेल्या सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र स्थळाचा परिसर अभयारण्य म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ जैन धर्मियांनी आज सकाळी बेळगावात भव्य मोर्चा काढला.
जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान असलेल्या सम्मेद शिखरजी परिसराला अभयारण्य म्हणून सरकारने घोषित केले आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला जाणे-येणे कठीण होणार आहे. त्यामुळे जैन धर्मियांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. देशभरातील जैन बांधव या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बेळगावातही आज शनिवारी जैन बांधवांनी भव्य मोर्चा काढला. राणी चन्नम्मा चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला.
माजी आमदार व भाजप बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह जैन समाजातील विविध मान्यवर व नागरिक, महिला, युवती मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. सरकारच्या निर्णयाला विरोध करणार्या मजकुराचे व घोषणांचे फलक मोर्चेकर्यांनी हाती घेतले होते. सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र स्थळाचा परिसर अभयारण्य करण्याचा निर्णय रद्द करावा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
Check Also
स्वामी विवेकानंद स्मारकाच्या भेटीचे जनतेला जाहीर निमंत्रण
Spread the love बेळगाव : स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 पासून सलग तीन दिवस …