बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील तुम्मरगुद्दी गावातील रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या अनुदानातून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून रस्ते बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.
रस्ते बांधकामाच्या शुभारंभाबरोबरच, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी नवीन जिमचे उद्घाटन करण्यात आले. बलवान युवकच सशक्त देश घडवू शकतात. त्यामुळे युवकांनी या सुविधेचा लाभ घेऊन सशक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. त्याचवेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तुम्मरगुद्दी गावात हळदी कुंकू कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार या नात्याने केलेल्या विकासकामांचे प्रतिबिंब हळदी कुंकू कार्यक्रमातून दिसून येत असून अनेक विकासकामेही सुरू करण्यात येत आहेत.
मतदारसंघातील जनतेचे प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वाद यातून आमदार म्हणून बेळगावच्या ग्रामीण मतदारसंघाचे नेतृत्व एका शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे करत असून कोरोना महामारीसारख्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत सर्वांच्या अडचणींना तत्परतेने प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची भाषणे झाली. गावातील ज्येष्ठ परशुराम पुजेरी, प्रकाश शिनगी, सत्यव्वा शिनगी, कमलम्मा महार, सुरेश नाईक, शेखर होसुरी, बसनगौडा पाटील, बाळाप्पा शिनगी, सत्याप्पा नंद्यागोळ, लक्ष्मण केंपादिन्नी, शिवाजी तलवार, शिवशंकर पाटील, शेखरनाथ शिनगी, शेखर शिनगी व कार्यकर्ते उपस्थित होते.