Monday , April 20 2026
Breaking News

नियंत्रण सुटून गाडीचा चोर्ला घाटात अपघात; एक जण ठार

Spread the love

 

खानापूर : गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला झालेल्या अपघातात जमखंडी तालुक्यातील एक जण ठार तर 12 जण गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चोर्ला घाटात घडली. सदर अपघातात शिवानंद सज्जन, बनहट्टी (वय 36 जमखंडी) असे मृताचे नाव असून याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी जमखंडी येथील कुटुंबीय टेम्पो ट्रॅव्हलरने गाडी नंबर 51 बी 7471 सहलीसाठी गोव्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी चोर्ला जवळील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वेगात असलेले वाहन रस्त्याकडेला जाऊन आढळले. यात समोर बसलेल्या शिवानंद यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात वैभव सज्जन, व्यंकाप्पा नाईक, शिरीष पोतदार, सतीश राठोड, पार्वती एम, सुरेश एम, लक्ष्मी मिरडे, श्रीशैल के, गायत्री नंदी, महांतेश होसमनी, श्रीदेवी सुतार, एस, आदी जखमी झाले. वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रज्योत फटे यांनी पंचनामा करून अपघाताची नोंद केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

रौडीशिटर व खानापूर पोलीस यांच्या अभद्र युतीसंदर्भात खानापूर काँग्रेस ब्लॉकतर्फे तहसिलदारांना निवेदन

Spread the love  खानापूर : खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेसतर्फे आज रौडीशिटर व खानापूर पोलीस यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *