सौंदलगा : येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेत मेट्रीक मेळा, बालआनंद बाजार नुकताच उत्साहात पार पडला. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक धनंजय ढोबळे यांनी मान्यवरांचे स्वागत करत बालआनंद बाजारची माहिती दिली. शाळेचे अध्यक्ष शंकर कदम यांनी मान्यावरांचे उपस्थितीत रिबनची फिर सोडून उद्घाटन केले.
यावेळी विविध फळे, फळभाज्या, पालेभाज्या, शालोपयोगी पुस्तके, खेळणी आणि पावभाजी, पाणीपुरी, भेळ, हाॅटेलचे पदार्थ या बाजारचा मुला, मुलींनी खुपच आनंद घेतला.
यावेळी चपाती भाजी, पुलाव, गुलाबजामुन, या स्टाॅलवर विशेष गर्दी दिसून आली. यावेळी शाळा समितीचे सदस्य दतात्रय बोरगावे, अमर सुतार, अरिफ मुल्ला, सागर पवार, अमृत चौंगुले, संजय पाटील, पल्लवी रजपूत, तसेच महंमदरफिक मोकाशी, स्टाॅलचे नियोजन सुमन मेस्त्री, अमिता करणुरकर, लता शेवाळे, स्वाती व्हरकट, वीणा महेंद्रकर, विनय भोसले, यांनी केले होते तर दिपक सुतार, श्रीनिवास ढाले पालक शिक्षकांचे सोबत असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
शेवटी आभार आणि सुत्रसंचलन अनिल शिंदेनी केले.