बेळगाव : शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी शनी प्रदोष आणि महाशिवरात्र असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. या निमित्ताने पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात शनी होम, शनी शांती, तैलाभिषेक, रुद्राभिषेक आदि सेवांचे आयोजन करण्यात आले आहे. शनी प्रदोष निमित्त सायंकाळी सहा वाजता विशेष अभिषेक करण्यात येणार आहेत. संपूर्ण दिवसभर मंदिरात प्रसाद वितरण करण्यात येणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता मंदिरात पालखी सेवा होणार आहे. भक्तांनी अधिक माहितीसाठी मंदिरात संपर्क साधावा.
शनी प्रदोषाचे महत्व
शनिदेव हे भगवान श्रीशंकराचे भक्त असल्याने शनिवारी येणाऱ्या त्रयोदशीस केलेले व्रत सर्व दोषां पासुन मुक्ती देते असे मानले जाते. शनी पिडा असलेल्या व्यक्तींनी या दिवशी शनीची उपासना, पूजा केल्यास लाभदायक ठरते.
शनिवारी शनी प्रदोष होतो, जो खूपच महत्वाचा असल्याचे मानण्यात येते. हे व्रत केल्याने संतती प्राप्ती व जीवनात यश प्राप्ती होते.
तुम्हाला आयुष्यात वारंवार मानसिक शारीरिक किंवा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही शनीच्या अशुभ प्रभावाखाली असण्याची शक्यता आहे. यामुळे शनी उपासना व शांतीचा उपाय जाणून घेणे योग्य ठरते. हे करणेही शक्य नसेल तर प्रदोष व शनिवारचा योग म्हणजे शनी प्रदोष शनिदेवाच्या शांतीसाठी उपयुक्त आहे.