Sunday , September 20 2026
Breaking News

वैजनाथ देवालय येथे १८ फेब्रुवारीला महाशिवरात्री उत्सव

Spread the love

 

देवरवाडी : फाल्गुन मास कृष्ण पक्ष चतुर्दशीतिथीला दि. १८ फेब्रुवारीला २०२३ रोजी प्रसिद्ध वैजनाथ देवालय देवरवाडी येथे महाशिवरात्री उत्सव साजरा होत असून नूतन स्थानिक सल्लागार उपसमितीकडून याचे मोठ्या प्रमाणात नियोजन सुरू आहे.

१७ फेब्रुवारी मध्यरात्री १२ वा. पासून सकाळी ५.३० वाजेपर्यंत अभिषेक कार्यक्रम होईल. त्यानंतर महाशिवरात्री शुभारंभ सुरू होवून रात्री याम पूजा झाल्यावर मध्यरात्री १२ वा. महाशिवरात्र समाप्ती होईल. रविवार १९ फेब्रुवारीला महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी दु. १२ ते ४ वाजे पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर महाशिवरात्री उत्सवाची सांगता होईल. सीमाभागातील व पंचक्रोशितील भाविक भक्त जणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नूतन वैजनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीकडून करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; हुक्केरी तालुक्यातील तिघांना अटक

Spread the love  चंदगड : तिलारी घाटातील प्रेशर पॉईंट परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *