खानापूर : खानापूर तालुक्यातील देवलट्टी गावाला सातत्याने विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वारंवारच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे देवलत्ती गावातील नागरिकांना विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गावातील वीज समस्येची दखल घेऊन भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी ऊर्जामंत्री सुनिल कुमार यांना पत्र पाठविले. देवलत्ती गावातील सध्याची गर्लगुंजी वीजवाहिनी बदलून देवलत्ती गावाला लोकोळी-लक्केबैल मार्गाने वीजपुरवठा करण्याची विनंती डॉ. सरनोबत यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केली. त्यानुसार नुसार देवलत्ती गावातील वीजपुरवठा संदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना ऊर्जामंत्र्यांनी दिल्या आहेत.
27 डिसेंबर 2022 रोजी डॉ. सोनाली सनोबत यांनी ऊर्जामंत्र्यांची भेट घेऊन देवलत्ती गावातील वीज समस्या संदर्भात निवेदन सादर केले होते. बेळगाव ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी सदर वीज समस्येबाबत संबंधित विभागाकडे कार्यवाही अंमलबजावणीची सूचना केली होती.
ग्रामीण क्षेत्रातील चार लिंक लाईनच्या कामांसंदर्भात 93.88 लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक विभागीय कार्यालयाकडे सादर करण्यात आपले होते खानापूर तालुक्यातील देवलत्ती गावातील लिंक लाईनसाठी 16.52 लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मागण्यात आली होती. बेळगाव झोनचे मुख्य अभियंता हुविसंकन्नी यांनी हुबळीचे महाव्यवस्थापकांना 16.52 लाख रुपये तात्काळ जारी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार सदर रक्कम मंजूर झाल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
देवलठी ग्रामस्थांच्या अनेक दिवसांच्या मागणीचा अखेर पाठपुरावा झाला आहे गावातील वीज समस्या कायमस्वरूपी दूर व्हावी या संदर्भात निधी मंजूर झाला आहे. यासाठी डॉक्टर सोनाली सरनोबत यांचे प्रयत्न कामे आले आहेत त्याबद्दल गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. लोकोली-लक्काबिलेद्वारे वीजपुरवठा करण्याच्या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
विजेची समस्या मार्गे लागल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने उद्या शनिवारी सायंकाळी देवलती व कामशिनकोप्प ग्रामस्थांच्या वतीने डॉ. सोनाली सरनोबत यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.