Saturday , September 21 2024
Breaking News

हातकणंगलेसह लोकसभेच्या पाच ते सहा जागा स्वतंत्रपणे लढविणार; राजू शेट्टी यांची घोषणा

Spread the love

 

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरणार असून राज्यात हातकणंगलेसह पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली. कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार त्याचा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अभ्यास शिबीराच्या सांगता सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आंबा (ता. शाहूवाडी) येथे शिबीर झाले.

शेट्टी म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आहेत. भाजपमधून या अगोदरच बाजूला झालो आहोत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष चालू आहे. रस्त्यावरची लढाई संपलेली नाही. केंद्र व राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही, असे ठणकावून सांगणे गरजेचे आहे.

आम्ही मांडलेला हमीभावाचा कायदा अजून प्रलंबित आहे. केंद्र जोपर्यंत हमीभावाचा कायदा करत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यावर कोणत्याच सभागृहात चर्चा केली जात नाही. त्यासाठी शेतकरी प्रश्नावर बोलणारे लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून जाणे गरजेचे आहे. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, अजित, संदीप राजोबा, सचिन शिंदे, आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवात प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या संकल्पना राबवू नयेत

Spread the love हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर महापालिका आयुक्तांना निवेदन कोल्हापूर : प्रदूषण नियंत्रण मंडळाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *