Saturday , September 21 2024
Breaking News

विजयपूरात मित्राचा खून करून एकाची आत्महत्या

Spread the love

विजयपूर : एका तरुणाने मित्राचा चाकूने वार करून हत्या केल्याची व स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना विजयपूर शहरातील लक्ष्मी सिनेमा मंदिर समोरील राजधानी लॉजमध्ये घडली आहे.
बेल्लारी जिल्ह्यातील हागरीबोम्मनहल्ली तालुक्यातील कृष्णपुरा तांडा येथील रहिवासी सी. इंद्रकुमार यांची हत्या करण्यात आली. त्यांची हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.
राजधानी लॉज रूम नंबर 114 मध्ये दोन मृतदेह एकमेकांच्या जवळ पडलेले आढळले.
इंद्रकुमार नावाची व्यक्ती 22 मार्च रोजी लॉजवर आला आणि त्याने आधार कार्ड दाखवून रुम क्रमांक 114 मिळविला. नंतर आणखी एक व्यक्ती त्याच्या रुममध्ये कधी आल्याचे लॉजच्या कर्मचाऱ्यांना आणि मालकालाच माहिती नाही. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास रुममधून दुर्गंधी येऊ लागली, तेव्हा लॉजच्या कर्मचार्‍यांनी रुम काढण्यासाठी मास्टर चावीचा वापर केला असता खून झाल्याचे समोर आले. इंद्र कुमार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना, त्यांची हत्या करणाऱ्या आणखी एका व्यक्तीचा मृतदेह तिथे पडलेला आढळला.
यासोबतच रुममध्ये दुचाकीची चावी सापडली. विजयपुरा तालुक्यातील अरकेरी येथील रहिवाशाच्या नावावर दुचाकीची नोंदणी आहे. त्या व्यक्तीचा या दोघांच्या मृत्यूशी संबंध असू शकतो का? की ती दुचाकी चोरीला गेली आहे? त्याचा शोध घेणे आवश्यक आहे. ही दुहेरी हत्या की दुहेरी आत्महत्या, हे पोलीस तपासात समोर येईल.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. कूत्रे
आणि फिंगरप्रिंट तज्ञ आले आणि त्यांनी माहिती गोळा केली.
एसपी आनंद कुमार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती दिली
या दोघांच्या मृत्यूमागील गूढ शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. मृत इंद्रकुमारच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली असून त्यांनी घटनास्थळी पोहोचून मृत्यूचे गूढ उकलल्यानंतर पुढील तपास करण्यात येईल.
ही घटना गांधी चौक पोलिस ठाण्यात हद्दीत घडली.

About Belgaum Varta

Check Also

कळसा-भांडूरी प्रकल्पाला त्वरित मंजुरी द्या

Spread the love  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पंतप्रधान मोदींना पत्र बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *