Saturday , September 21 2024
Breaking News

काँग्रेसच्या 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Spread the love

 

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने 124 उमेदवारांची पहिली यादी आज शनिवारी सकाळी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे सचीव मुकुल वासनिक यांनी सदर यादी जाहीर केली आहे.
या यादीमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी के. शिवकुमार हे कनकपुरा मतदारसंघातून तर सिद्धरामय्या वरुणा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर बेळगाव जिल्ह्यातून बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूर मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांना तर यमकनमर्डी मतदार संघातून सतीश जारकीहोळी, कुडची मतदारसंघातून महेंद्र तमन्नावर, चिकोडी मतदारसंघात गणेश हुक्केरी, कागवाड बी. ए. कागे, रामदुर्ग अशोक पट्टण, बैलहोंगल महांतेश कौजलगी, हुक्केरी ए. बी. पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिणबाबतचा काँग्रेसचा सस्पेन्स अद्यापही बाकी आहे.

About Belgaum Varta

Check Also

ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रमाची आवश्यकता : वाय. पी. नाईक

Spread the love  बिजगर्णी…(बेळगाव) : विद्यार्थी दशेत आपल्याला कोण व्हायचे आहे ते निश्चित करणं गरजेचं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *