Share
उत्तम पाटील : निपाणीत कोपरा सभा
निपाणी (वार्ता) : अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून सतत ३० वर्षे समाजसेवेचे व्रत सुरू आहे. सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या आदर्श वाटचालीवरूनच आपण पदाक्रांत करत असताना सर्वसामान्य नागरिकांचे हित जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. काय समाजकार्याला राजकारणाची जोड हवी असल्याने आपण निवडणूक रिंगणात आहोत. अनेक भुलथापा मारत असून त्यांना बळी पडू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांनी केले. येथील पावले गल्ली येथे अनेक विकास कामे राबविणार असे आश्वासन दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आज अखेर कोणतीच कामे केली नाही. त्यामुळे कंटाळून कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याप्रसंगी आयोजित कोपरा सभेत उत्तम पाटील बोलत होते.
उमेदवार उत्तम रावसाहेब पाटील यांनाच मतदान करणार असल्याचा निर्णय पावले गल्ली येथील नागरिकांनी व सावित्रीबाई महिला बचत गट यांनी केला. यावेळी नगरसेवक डॉ. जसराज गिरे, संजय पावले, रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला, उदय खापे, उमेश जाधव, गुरुनाथ जाधव, शशिकांत जाधव, संतोष पावले, विनायक कडूकर, विकास कडूकर, केशव जाधव, अरविंद जाधव, युवराज पावले, गणेश पावले, विक्रम धाडमोडे, सोनल कडूकर, आशाताई पावले, निशा जाधव, राधिका कडूकर यांच्यासह कार्यकर्ते युवक व महिला उपस्थित होत्या.
Post Views:
1,047