धन्यकुमार गुंडे : निपाणीत जैन वधू-वर पालक मेळावा
निपाणी (वार्ता): लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जात असल्या तरी ते जुळवताना मुला मुलींच्या माता-पित्यांना धडपड करावी लागते. संसार करताना पती-पत्नीने एकमेकांवर विश्वास ठेवून संसारात रमले पाहिजे. पती-पत्नी मधील गैरसमतीमुळे घटस्फोटासारख्या घटना वाढल्या आहेत. त्या टाळण्यासाठी एकमेकांच्या समंजस्यांने वागणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुलगा आणि मुलगी यामध्ये भेदभाव केल्यास भविष्यात विवाहाच्या बाबतीत समाजात मोठे संकट निर्माण होणार आहे, असे मत नवी दिल्ली येथील केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे यांनी व्यक्त केले.
येथील शुभकार्य वधू-वर सूचक संघातर्फे रविवारी (ता.२८) येथील व्यंकटेश मंदिरात आयोजित जैन वधू-वर पालक परिचय मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
प्रारंभी ॲड. शितल मेकक्ळकी यांनी स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावरील मानवारांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यावर मान्यवरांचा सत्कार झाला.
यावेळी विविध मान्यवरांनी समाज व्यवस्था आणि विवाह यावर मनोगत व्यक्त केले. वधू-वर मेळाव्यात २५० पेक्षा अधिक वधू वर व पालकांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमास दक्षिण भारत जैनसभेचे अध्यक्ष सहकाररत्न रावसाहेब पाटील, पीडब्ल्यूडी अभियंते भरत बेडकीहाळे, अजितकुमार हुक्केरीकर, अजितराव कित्तूर, ॲड. रणजीत सांग्रोळे, ॲड. अरुण खोडबळे, बाहुबली हरदी, प्रशांत गुंडे, संजयकुमार शिरगावे, डॉ. शितल चौगुले, डॉ. संकेत पाटील, नगरसेविकास सोनाली उपाध्ये, प्रमोद पंडित सचिन उपाध्ये सुकुमार बळोळे, सुनिता खंजीरे, रावसाहेब काश्मिरे, माणिक पाटील राजू कामांना प्रदीप हांजे, विश्वनाथ जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शुभ कार्य वधु-वर सुचक संघाचे संस्थापक दादासाहेब खोत यांनी आभार मानले.