खानापूर : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यीका यांच्या वतीने विविध मागण्यासाठी व समस्या दूर करण्यासाठी तालुक्यातील विविध खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. प्रारंभी जांबोटी क्राॅसवरून अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यीका यांनी मोर्चाला सुरूवात केली. जांबोटी क्राॅसवरून पणजी बेळगांव महामार्गावरून शिवस्मारक चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
यावेळी तहसील कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करून आवार दणाणून सोडला.
यावेळी उपतहसीलदार वैजू मॅगेरी यांना अंगणवाडी संघटनेच्या प्रमुख मेघा मिठारी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
निवेदन म्हटले आहे की, अंगणवाडी सेविकांचा आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणासह इतर काही कामे लावू नये. सेविकांना दिलेले खराब दर्जाचे व खराब झालेले मोबाईल तात्काळ परत मागुन घावे व नविन मोबाईल किंवा टॅब द्यावेत.
सेविकांना दिलेले मोबाईल आगोदरच खराब झालेले असल्याने गृह भेटीचे रेकार्ड, वजनाची माहिती, पोशन ट्रॅक मध्ये नविन मुलांची भर पडणे, याची नोंद ठेवणे अवघड असल्याने ते मोबाईलवर अपलोड करता येत नाही. याची नोंद अधिकाऱ्यांनी घ्यावे. अंगणवाड्याना पुरविल्या जाणाऱ्या अंडी निवेदनाचा परिणाम निकृष्ट तसेच आकाराने लहान असलेल्या अंड्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असुन वेळेवर पुरवठा होत असल्याने बाल विकास समितीकडे देण्यात यावा. भाडोत्री अंगणवाडी इमारतीचे भाडे सहा महिन्याऐवजी प्रत्येक महिन्याला द्यावे. अंगणवाडी केंद्रात ठेवलेल्या नोंदणी कमी कराव्यात, कारण मोबाईलवर काम केल्याने दोन्ही नोंदणी करणे कठीण आहे कोणतीही एकच नोंदणी करण्याची कार्यवाही करावी. कर्नाटक सरकारने आधीच जाहीर केलेल्या हमी पैकी सहावी हमी म्हणजे सेविकांना १५ हजार रूपये व सहाय्यीकाना १० हजार रुपये मासीक मानधन वाढविण्यात यावे. तसेच निवृत्तीनंतर पेन्शन धारकासाठी ३ लाख रुपये लागु करावे, अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी उपतहसीलदार वैजू मॅगेरी यांनी निवेदनाचा स्विकार करून सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. निवेदनात म्हटले आहे अर्थसंकल्पात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही एकदिवसीय आंदोलन छेडण्याचा असल्याचा इशारा दिला आहे.
यावेळी निवेदन देताना अंगणवाडी संघटनेच्या प्रमुख मेघा मिठारी, भारती पै, अनिता पाटील, अनिता कडोलकर, ज्योति जांबोटी, यांच्यासह शेकडो सेविका उपस्थित होत्या.