Saturday , September 21 2024
Breaking News

मणिपूर महिला अत्याचार व्हिडिओ प्रकरणातील आरोपीचे घर संतप्त महिलांनी जाळले

Spread the love

 

इंफाळ : मणिपूर येथे मे महिन्यात दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल स्वत: सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपीला पकडण्यातही पोलिसांना यश आलं आहे. आरोपीला पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर संतप्त जमावाने या आरोपीचे घरच पेटवून दिलं आहे. आरोपीच्या घराला आग लावून जमावाने निषेध नोंदवला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये काही नराधम दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढत असल्याचं दिसत आहे. या महिला विव्हळत, गयावया करत सुटकेची विनंती करताना दिसत आहे. त्यानंतर काही लोक या महिलांना शेतात ओढून नेताना दिसत आहे. याच ठिकाणी या महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली आहे. ठिकठिकाणी या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. आंदोलन केलं जात आहे. निदर्शने होत आहेत. संसदेतही काल आणि आज या घटनेचे पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेतही या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

घरच पेटवलं
या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि मणिपूर सरकारला चांगलंच फटाकरलं आहे. त्यानंतर पोलिसांनी खडबडून जागे होत चार आरोपींना अटक केली आहे. त्यातील मुख्य आरोपीचं नाव हुउरेम हेरोदास असं आहे. हेरोदासला अटक झाल्यानंतर आणि तोच या घटनेचा करताकरविता असल्याचं समजल्यानंतर त्याच्या शेजारी राहणाऱ्यांनी त्याच्या घराला आग लावली आहे. आरोपीचं घर नोंगपोक सेकमाई पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं. गुरुवारी संध्याकाळी शेजारीपाजारी एकत्र आले आणि त्यांनी हेरोदासचं घर पेटवून दिलं.

महिलांनीच पेटवलं घर
विशेष म्हणजे हेरोदासच्या घराला महिलांनीच आग लावली आहे. महिलांनीच त्याच्या घरावर चाल करत जाळपोळ करून आपला संताप व्यक्त केला आहे. या महिलांनी संतप्त भावनाही व्यक्त केल्या आहेत. या महिला मेतई समाजातील आहे. भलेही आरोपी आमच्या समाजातील असेल. पण अशा प्रकारच्या कृत्यांचं आम्ही कदापि समर्थन करणार नाही, असं या महिलांनी म्हटलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये भीषण अपघात; ७ जणांचा जागीच मृत्यू

Spread the love  जबलपूर : मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये बुधवारी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *