Saturday , September 21 2024
Breaking News

अंगणवाडी कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

Spread the love

 

बेळगाव : मतदार यादीत नावनोंदणी, नावे वगळणे आदी कामे करण्यासाठी दिलेल्या बूथ लेव्हल ऑफिसरच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अधिकाऱ्यांची धमकी, दादागिरी थांबवावी आदी मागण्यांसाठी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी बेळगावात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले.

ऑल इंडिया ट्रेंड युनियन काँग्रेसच्या (आयटक) नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अंगणवाडी कार्यकर्त्यांनी बेळगावात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. बूथ लेव्हल ऑफिसरच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अधिकाऱ्यांची धमकी, दादागिरी थांबवावी, अंगणवाड्यांचे गेल्या 18 महिन्यांपासून थकलेले भाडे तसेच गॅस बिलाची रक्कम तिवारी अदा करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी निदर्शक कार्यकर्त्यांनी अधिकारी आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या नेत्या गीता भोसले यांनी सांगितले की, अंगणवाडी कार्यकर्त्यांना आपल्या खात्याची कामे करतानाच नाकी नऊ येत आहेत. तशात हा सर्व्हे, तो सर्व्हे अशी कामे आणि बीएलओची कामे लावण्यात येत आहेत. त्यामुळे कामाचा ताण वाढला असून, अंगणवाडीत मुलांना शिकवायला वेळ मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आम्हाला बीएलओच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी मागणी त्यांनी केली.

आयटकच्या जिल्हा संघटक वाय. बी. शिग्गीहळ्ळी म्हणाल्या की, अंगणवाडी कार्यकर्त्यांना बीएलओचे काम दिल्याने घरोघरी सर्व्हे करण्यास जावे लागल्याने मुलांना शिकवायला, दिलेली इतर कामे करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे अंगणवाड्यांमधील मुलांची संख्या कमी होत चालली आहे. त्यावर अधिकारी अंगणवाडी कार्यकर्त्यांना कारवाईची, निलंबित करण्याची, धमकी देत आहेत. गेल्या शनिवारच्या बैठकीत आम्ही आमच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केल्यावर मनपा आयुक्तांनी हलके शब्द वापरून आमचा अवमान केला आहे. सरकारने गेल्या 18 महिन्यांपासून अंगणवाड्यांचे भाडे तसेच गॅसची बिले मंजूर केलेली नाहीत. त्यामुळे अनेक इमारत मालकांनी अंगणवाड्यांना टाळे ठोकले आहे. आम्हीच पैसे जमवून भाडे आणि गॅसची बिले भरली आहेत. ती रक्कम सरकारने त्वरित मंजूर करावी, आम्हाला बीएलओच्या कामातून मुक्त करावे अशी मागणी केली.

यानंतर जिल्हा प्रशासनाला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी निदर्शक अंगणवाडी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जिल्ह्याच्या विविध ठिकाणांहून आलेल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार प्रकरणी; सहा जणांना 20 वर्षांची कठीण शिक्षा

Spread the love  बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *