निपाणी (वार्ता) : येथील अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेला मल्टीस्टेट संस्थेचा दर्जा मिळाला आहे. त्यानुसार या संस्थेची निवडणूक घेण्यात आली. संस्थेचे कार्य पाहून सर्वांच्या मते ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली.
यावेळी अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष सहकारत्न रावसाहेब पाटील, उपाध्यक्षपदी खडकलात येथील सतीश पाटील यांची निवड करण्यात आली. तर संचालक पदी युवा उद्योजक अभिनंदन पाटील, अभय कुमार करोले, जयपाल नागावे, आप्पासाहेब कडोले, पिरगोंडा पाटील, भुजगोंडा पाटील, शरदकुमार लडगे, बाबासाब अफराज, श्रीकांत वसवाडे, संदीप पाटील, शिवानंद राजमाने, अजित मगदूम, निर्मला बल्लोळे, अजित कांबळे यांची निवड करण्यात आली.
सहकारत्न रावसाहेब पाटील यांनी, संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत सर्वांच्या सहकार्याने संस्था प्रगतीपथावर आहे. केवळ लाभ न मिळवता सामाजिक कार्यातही संस्था अग्रेसर आहे. यापुढील काळात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेतर्फे नूतन पदाधिकारी व संचालकांचा सत्कार झाला.
यावेळी बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील, दत्त कारखान्याचे उपाध्यक्ष इंद्रजीत पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, आनंद गिंडे, नगरसेवक अभयकुमार मगदूम, संगाप्पा ऐदमाळे, निरंजन पाटील-सरकार, शिरीष कमते इम्रान मकानदार, दिलीप पठाडे, राजेंद्र कंगळे, शशीकुमार गोरवाडे मुख्य व्यवस्थापक अशोक बंकापुरे, सहाय्यक प्रधान व्यवस्थापक शांतीकुमार यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते.