खानापूर : अखिल भारतीय कर्नाटक राज्य बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघटना तालुका खानापूर व सरकारी हॉस्पिटल खानापूर आणि मौजे मोदेकोप यांच्या संयोजनातून सदरी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
विश्व ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त 01 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी ठीक 10 वाजता शिबिर सरकारी मराठी शाळा मोदेकोप येथे उद्घाटनाचा कार्यक्रम मोदेकोप गावचे ज्येष्ठ नागरिक श्रीयुत तुकाराम कुलम हे अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रमुख पाहुणे खानापूर तालुका सरकारी हॉस्पिटलचे मुख्य डॉ. एम. बी. किडसनवर, संघटनेचे अध्यक्ष
श्री. व्ही. एम. बनोशी आणि नागुर्डा ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष संतोष पाटील, कल्लाप्पा गावडे हे होते.
पाहुण्यांचे स्वागत संघटनेचे उपाध्यक्ष आबासाहेब दळवी यांनी केले. प्रास्ताविक संघटनेचे ऑर्गनायझेशन सेक्रेटरी एल. डी. पाटील यांनी केले. ईशस्तवन श्री. एन. जे. गुरव, स्वागतगीत श्रीमती एल. एन. बोरजीस मॅडम यांनी केले. संघटनेचे जॉईन सेक्रेटरी यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केले.
ज्येष्ठ नागरिक संघटनेचा इतिवृत्तांत संघटनेचे सचिव श्रीयुत सी. एस. पवार यांनी सादर केला.
सरकारी हॉस्पिटलचे डॉक्टर मुख्याधिकाऱ्यानी हेल्थ प्रधान मंत्री कार्ड सर्वांनी रजिस्टर करावे तसेच खानापूरला सर्व विशेष तज्ञ डॉक्टर आहेत यांचा सर्वांनी लाभ घ्यावा. आम्ही नेहमी ज्येष्ठ आणि आबाल यांच्याकरिता सेवेला सदैव आहोत असे आवाहन केले. संघटनेच्या अध्यक्षांनी ज्येष्ठ नागरिकांचे समाजाकरिता असणारे हित आणि त्यासाठी एकत्रित एक संघपणे संस्थेचे कार्य सुरुवात आहे. आज 350 सभासद आहेत. तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या संघटनेच्या सेवेचा लाभ घ्यावा व सदस्य होण्यास परावर्तन केले. सभेच्या अध्यक्षांनी एक ध्येय व एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. आपल्या मोदेकोप गावांमध्ये हे उदाहरण आपणास पहावयास मिळत आहे. हा आदर्श संपूर्ण तालुक्यातील गावांनी घ्यावा असे आवाहन केले.
मोफत आरोग्य शिबिर व नेत्र चिकित्सा एकूण 300 लोकांची तपासणी करून 200 लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. दातांचे डॉक्टर यांच्याकडून 100 जणांची तपासणी करून उपाययोजना व औषधे देण्यात आली. सरकारी हॉस्पिटल आणि देवेगौडा चॅरिटेबल हाडांचे हॉस्पिटल यांच्याकडून बीपी शुगर सांधेदुखी आणि स्त्रियांचे आजार असे एकूण 200 रुग्ण तपासणी करून त्यांना वैद्यकीय सल्ला व औषधे देण्यात आली. एकंदर 500 पेक्षा अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
मोदेकोप ग्रामस्थांनी सर्व लोकांकरिता अल्पोपहार चहापान जेवण आणि सर्वांचे याथासांग सेवा केली हेच मोदेकोप गावचे वैशिष्ट्य आभार प्रदर्शन श्रीयुत रमाकांत वाघमारे यांनी केले. आज स्वच्छता दिनाबाबत शाळा परिसर स्वच्छ करून भारतीय स्वच्छता दिन साजरा करण्यात आला.
या कार्यासाठी स्वयंसेवा व उपस्थिती अनेक मान्यवरांची होती.
संघटनेचे खजिनदार श्रीयुत रामचंद्र सावंत, एस. एस. जिगजिनी, ज्येष्ठ सभासद श्रीयुत पांडुरंग डिचोलकर, श्रीयुत वसंत पाटील, श्रीयुत एमडी वारके, श्रीयुत ए आर. मुणगेकर, श्रीमती लक्ष्मी जैन, आरएसएस डॉक्टर पी डी सोमनावर, डॉक्टर संजीव बावची, श्रीधर तम्मानगोळ शिवानंद बुडरगट्टी, रविराज पै, भीमगौडा पाटील, डॉक्टर ज्योती श्रीमती, हेमा नाडगौड, श्रीमती वीणा, श्रीमान दुंडाप्पा, श्रीमती नूतन आणि सचिन श्री हेल्थ सेंटर बेळगाव मार्फत डॉक्टर नागराज श्रीयुत हिरेमठ, श्रीयुत मारुती, श्रीयुत इकबाल, श्रीमती सुलोचना, श्रीमती मनोरमा यांनी सेवा बजावली.
गावातील उपस्थित व स्वयंसेवा लक्ष्मण मिसाळ, नागप्पा कार्वेकर, धोंडीबा पाटणेकर, वसंत केसरीकर, कल्लाप्पा गावडे, गोपाळ केसरीकर, दिगंबर केसरकर, निवृत्ती गुरव, चंद्रकांत गुरव, मारुती कार्वेकर, शिवाजी लोकोळकर, मीनाजी खराडे, पुंडलिक केसरीकर, भरमानी गुरव आदी उपस्थित होते.