निपाणी (वार्ता) : निपाणीत अभुतपुर्व उत्साहात दुर्गामाता दौडीस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ करण्यात आला. यावेळी पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तिचे पूजन ध्वज पूजन आणि शस्त्र पूजन, जगदेंबेची आरती श्रीमंत विजयराजे देसाई निपाणकर सरकार यांच्या हस्ते करून श्री दुर्गामाता दौड निपाणकर वड्यातून मार्गस्थ झाली. तेथून सटवाई रोड, कोठीवाले कॉर्नर, रविवार पेठ येथील महालक्ष्मी मंदिरात आरती होऊन तेली गल्ली, थळोबा पेठ, भाट गल्ली, मेस्त्री गल्ली, पावले गल्ली, विटेकरी गल्ली मार्गे छत्रपती शिवाजी चौक येथे दौडीची सांगता झाली. पहिल्या दिवशी दुर्गामाता दौडीला उत्स्फूर्त प्रतिसादमिळाला. बालचमू तसेच युवतीव तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागाने वातावरण भारावले होते.
यावेळी सागर खांबे, अमित देसाई, दीपक बुडके, शिवशंभु प्रेमी व मध्यवर्ती शिवाजी तरुण सर्व पदाधिकारी, मंडळाचे सर्व सभासद, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————————————–
आकर्षक रांगोळ्यासह पुष्पवृष्टी
दुर्गामाता दौडीच्या मार्गावर नागरिकांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. तर काही कुटुंबीयांनी दौडीमधील कार्यकर्त्यावर पुष्पवृष्टी केली.