Saturday , September 21 2024
Breaking News

येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने हेस्कॉमला निवेदन सादर

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतच्या व्याप्तीतील पाणी पुरवठा संदर्भात नाल्याला लागून असलेली धोकादायक स्थितीतील विद्युत वाहिनी रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, गावातील इतर ठिकाणी जीर्ण झालेले खांब हटवून नविन खांब उभारणी करण्यासंदर्भात तसेच ग्रामदेवता चांगळेश्वर देवी परिसर आवारा शेजारी जिथं एक शाळाही आहे आणि जिथं गावातील यात्रोत्सव आणि इतर धार्मिक कार्यक्रम होतात, अशा सार्वजनिक ठिकाणी जे धोकादायक स्थितीतील उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या आहेत त्या काढून केबलची व्यवस्था करावी जेणेकरून कोणताही धोका उद्भवणार नाही, अपघात घडणार नाही. गावातील काही ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मर्स धोकादायक स्थितीमध्ये आहेत ते तेथून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे, तसेच येळ्ळूर येथील विस्तारीत क्षेत्रात केईबीच्या माध्यमातून खांब उभारून पथदिपाची सोय करावी अशा संदर्भातला देखील निवेदन हेस्कॉमला सादर करण्यात आलं.
यासंदर्भात याआधीही अनेक वेळा हेस्कॉमला निवेदन देण्यात आले असून याकडे जाणूनबुजून अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले होतं. येळ्ळूर ग्रामपंचयतीच्यावतीने कोणतीही थकबाकी शिल्लक नाही शिवाय वेळोवेळी विद्युत बिले भरण्यात आलेली आहेत असे असतानाही असे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित करत यावेळी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हे निवेदन देण्यात आलं असून या विभागातील, विभाग अधिकाऱ्यांनी दोन वर्षात कोणतेही काम केलेले नाही त्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी आणि यावेळी तरी या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित समस्या सोडवाव्यात अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकऱ्यांकडे करण्यात आली.
यावेळी हेस्कॉम अधीक्षक अभियंता नवीनकुमार चिक्काडे यांनी या निवेदनचा स्वीकार करून जी काही कामे झाली नाहीत ती नेमकी का झाली नाही याचा जाब त्या विभाग अधिकाऱ्यांना विचारून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि या संदर्भात त्वरित पावले उचलून कामे पूर्ण केली जातील असे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, परशराम परीट, मिलिंद पाटील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रमाची आवश्यकता : वाय. पी. नाईक

Spread the love  बिजगर्णी…(बेळगाव) : विद्यार्थी दशेत आपल्याला कोण व्हायचे आहे ते निश्चित करणं गरजेचं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *