निपाणी (वार्ता) : येथील टॉप स्टार स्पोर्टस् क्लबतर्फे नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ येथील म्युनिसीपल हायस्कूलच्या मैदानावर आयोजित नितीन शिंदे चषक-२०२३, ग्रामीण व शहरी क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन उद्घाटन ज्येष्ठ खेळाडू भिकाजी शिंदे व प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिवंगत नितीन शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. अनिल भोसले यांनी स्वागत तर सुनील काळगे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर नगरसेवक रवींद्र शिंदे यांनी नाणेफेक केली. सुलतानपूर आणि खडकेवाडा संघात पहिला सामना होऊन त्यामध्ये खडकेवाडा संघाने सामना जिंकला.
सामाजिक कार्याबद्दल माजी नगरसेवक जुबेर बागवान आणि नगरसेवक रवींद्र शिंदे यांचा सत्कार झाला. प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांसाठी शहरी व ग्रामीण विभागाकरीता प्रत्येकी अनुक्रमे ५० हजार, २५ हजाराची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय मॅन ऑफ द सेरीज, अंतिम सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज अशी इतर वैयक्तिक पारितोषिके व कायमचा चषक देण्यात येणार आहे.
यावेळी धनलक्ष्मी संस्थेचे संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर खवरे, राजू नाईक, दिलीप घाटगे, वीरेंद्र येडुरे, युवा उद्योजक सोमनाथ शिंदे ओंकार शिंदे, आकाश खवरे, उदय पवार, बबलू मांगोरे, राजू नाईक, असलम बागवान, लहू मधाळे, महेश कांबळे, अक्षय पाटील, गणेश गायकवाड, अनिल भोसले, असिफ एकसंबे, गणेश ठोंबरे यांच्यासह टॉप स्टार स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. सुधाकर सोनकर यांनी सूत्रसंचालन तर नितीन साळुंखे यांनी आभार मानले.