Monday , September 21 2026
Breaking News

विजयपूर -बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात चार युवक जागीच ठार

Spread the love

 

विजयपूर : विजयपूर शहराजवळील विजयपूर- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री 11चा सुमारास एका भरधाव ट्रकने रस्ताबाजूस थांबले असलेल्या चार युवकांना धडक दिल्याने ते चार ही युवक जागीच ठार झाले असल्याची घटना घडली आहे.
शहरापासून 10 कि.मी. अंतरावर एका टोलनाक्याजवळ हा अपघात झाला असून, प्रवीण संगनगौडा पाटील ( वय 31), शिवानंद बसवराज चौधरी ( वय 24), इरण्णा अण्णाराय कोल्लार, ( वय 26), सुनिल खानापूर ( वय 26) हे सर्व जण रा. विजयपूर असे मृतांची नावे आहेत.

हे चौघे मित्र स्वतःच्या मोटार सायकलवरून राष्ट्रीय महामार्गावरील एका धाब्यावर जेवणासाठी गेले होते. जेवन झाल्यानंतर महामार्गानजीक रस्ताबाजूस बोलत थांबले होते त्याच दरम्यान विजयपूरहून बेंगळुरूच्या दिशेने जात असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने ते चार ही युवक जागीच ठार झाले. अपघात घडताच ट्रक चालक ट्रक घटनास्थळी सोडून फरारी झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा करून चार ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विजयपूर जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठविले व अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला आहे. विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *