Friday , October 18 2024
Breaking News

बेळगावात 64 व्या जिल्हास्तरीय फळ व पुष्प प्रदर्शनाला प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक शासन, बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, फलोत्पादन विभाग, ग्रामीण व लघु उद्योग विभाग, कृषी विभाग, जिल्हा फलोत्पादन संघ, जिल्हा कृषक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावातील क्लब रोडवरील ह्युम पार्क येथे आयोजित 64 व्या जिल्हास्तरीय फळ व पुष्प प्रदर्शन व औद्योगिक उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते झाले.
मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव येथील ह्यूम पार्क येथे 64 व्या जिल्हास्तरीय फळ व फुलांचे प्रदर्शन व औद्योगिक उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर आनंद व्यक्त केला. यावर्षी 64 व्या जिल्हास्तरीय फळ व पुष्प प्रदर्शन व औद्योगिक उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन अतिशय आकर्षक आहे. त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी नीटनेटकेपणे करण्यात आले आहे. शेतकरी व जनतेसाठी अतिशय सोयीचे आहे. फळे आणि भाजीपाला कोणत्या प्रकारची आहे याची संपूर्ण माहिती आणि त्यांची काळजी कशी घ्यावी माहिती येथे मिळेल. भाज्यांचे कोल्ड स्टोरेज बेळगावात आहेत, त्यासाठी केंद्र सरकारचे अनुदान मिळत आहे. आम्ही शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत आहोत, हिडकल धरणात प्रशिक्षण केंद्रे आहे. त्याचा प्रसार अधिक प्रमाणात व्हायला हवा, असे त्यांनी सांगितले.
उद्यान विभागाचे अधिकारी शिवानंद यांनी सांगितले की, आज बेळगाव शहरात 64 वे जिल्हास्तरीय फळ व फुलांचे प्रदर्शन व औद्योगिक प्रदर्शन सुरू असून, उद्यान विभाग, औद्योगिक विभाग, कृषी संस्था, कृषी विभाग, रेशीम विभाग, तसेच ललित कला विभाग आदींच्या सहकार्याने आयोजित केले आहे. बेळगावात 3 दिवस हे प्रदर्शन चालणार असून याचा जिल्ह्यातील सर्व जनतेने व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. कार्यक्रमाचे उद्घाटन करताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आनंद व्यक्त केला आहे. आम्ही अनेक आकर्षक प्रतिकृती फुलांनी बनवल्या आहेत. बेळगावातील बाराव्या शतकात बांधण्यात आलेल्या कमल बस्तीची फुलांनी प्रतिकृती आमच्या कर्मचार्‍यांनीही बनवली आहे. गौरी नामक म्हैसूरच्या रांगोळी कलाकारांनी फुलांच्या रांगोळ्या साकारल्या आहेत. फ्लॉवर शो मध्ये आनंद आणला आहे. सर्वांनी येऊन सहकार्य केले आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रादेशिक आयुक्त संजय बी. शेट्टनवर, उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विकास कुमार, एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद, शहर पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामपा, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, सोमशेखर हुल्लोळी, रवींद्र माविनहळ्ळी, महांतेश मुरगोड, शरणबसप्पा दर्शनापूर, एस. एस. मल्लिकार्जुन, शिवनगौडा पाटील, कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, उद्यान विभाग, ग्रामीण व लघु उद्योग विभाग, कृषी विभाग, जिल्हा फलोत्पादन संघ, जिल्हा कृषी संस्थेचे अधिकारी, जनता व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

म्हादई योजना १५ दिवसांत लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

Spread the love  बेळगाव : कळसा भांडुरा नाला, मलप्रभा नदी जोडणी युवा संघर्ष मध्यवर्ती समिती, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *