Sunday , September 20 2026
Breaking News

गणेश दूध केंद्राचा उद्या वर्धापन दिन

Spread the love

 

बेळगाव : उचगाव क्रॉस येथील गणेश दूध संकलन केंद्राचा १० वा वर्धापन दिन शनिवारी (ता. १९) दुपारी १२ वाजता होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळावा कार्यक्रम केंद्रात आयोजित केला आहे, अशी माहिती गणेश दूध केंद्राचे संचालक प्रवीण ऊर्फ उमेश देसाई यांनी दिली. गणेश दूध अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस आले आहे. १० वर्षांत केंद्राने चांगली प्रगती केली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळे तसेच दुधाला चांगला दर दिल्यामुळे अनेकांच्या पसंतीस गणेश दूध आले आहे. कार्यक्रमाला दूध उत्पादक शेतकरी, वितरक व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *