निपाणी (वार्ता) : येथील मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार, उद्योजक रघुनाथराव विठ्ठलराव कदम यांची पुण्यतिथी गुरुवारी (ता.२८) येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात गांभीर्याने झाली. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी निपाणी व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
येथील मराठा मंडळ संस्कृतीक भवनात निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शहर व परिसरातील नागरिकांनी आदरांजली वाहिली.
यावेळी माजी नगरसेवक संदीप चावरेकर, रामदास धोडफोडे, पांडुरंग धोंडफोडे, प्राचार्य सचिन कुलकर्णी, संजय कांबळे, संतोष नाईक, ज्ञानेश्वर लाड, व्यवस्थापक अशोक संकाजे, बाळासाहेब मोहिते, जयहिंद खपले, एस. एस. पाटील, प्रदीप सातवेकर, सुनील काकडे, काशिमखान पठाण, गणेश चावरेकर, अमित पठाडे, एकनाथ डवरी, मुख्याध्यापक पी. एम. सुतार, नंदा खराडे, शिल्पा कांबळे, उषा यादव, प्रभा घाटगे यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.