खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक रविवार दि. ७ रोजी दुपारी २ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये १७ जानेवारी हुतात्मादिन गांभीर्याने पाळणे व कर्नाटक सरकारच्या आश्रयाखाली कन्नड संघटनांनी सुरू केलेल्या कन्नडसक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
तरी या बैठकीला सर्व कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजन सरदेसाई आणि आबासाहेब दळवी यांनी केले आहे.