Monday , September 21 2026
Breaking News

येळ्ळूर व मच्छे शिवारामध्ये समाजकंटकांकडून गवत गंज्यांना आग

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर व मच्छे शिवारामध्ये समाजकंटकांकडून शेतकऱ्यांच्या भात गंजींना तसेच गवत गंज्यांना आग लावण्याचे प्रकार गुरुवारी रात्री घडले आहेत. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

येळ्ळूर येथील कोंडी शिवारामध्ये गंगाधर पाटील, उमेश पाटील यांच्या मोठ्या भात गंज्यांना आगी लावण्यात आल्या. यामध्ये दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुनील यशवंत घाडी यांच्या भात गंजींना आग लावण्यात आली. त्यामध्ये त्यांचेही ६० हजारांहून अधिक नुकसान झाले आहे. जवळच असलेल्या प्रकाश इंगळे यांच्या गवतगंजीलाही समाजकंटकांनी आग लावली. रात्री उशीरापर्यंत ही आग पेटत होती. अग्निशमन दलाला कळवून पाण्याचा बंब मागविण्यात आला. पेटलेल्या गंज्यांवर फवारणी करण्यात आली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

मच्छे शिवारातील भात गंजीला आग

मच्छे शिवारामध्ये असलेल्या मारुती कृष्णा चौगुले आणि त्यांचे भाऊ संभाजी चौगुले (रा. मच्छे) यांच्या भात गंजींना आग लावण्यात आली आहे. यामध्ये जवळपास दोन लाखांहून अधिक रकमेचे नुकसान झाले आहे. यल्लाप्पा टक्केकर आणि तानाजी कुट्रे यांच्या भात गंजींनाही आग लावण्यात आली आहे. यामध्ये दोघांचे जवळपास दीड लाखांचे नुकसान झाले आहे. बाबुराव भूजंग चिठ्ठी यांच्या भात गंजीला आग लावून ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून या समाजकंटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *