निपाणीत संभाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
निपाणी (वार्ता) : धर्मासाठी बलिदान कसे द्यावे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्ववावरून दिसून येते. युवा पिढीने त्यांचा इतिहास जाणून घेऊन त्याचे आचरण करावे. भारत मातेचे सौभाग्य टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. असे असताना केवळ स्वार्थासाठी महापुरुषांची नावे घेणे चुकीचे आहे, असे मत श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी व्यक्त केले. येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजीनगर नवीन वसाहत येथे लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळा ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
माजी आमदार काकासाहेब पाटील, युवा उद्योजक रोहन साळवे, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, पंकज पाटील, नगरसेवक विलास गाडीवड्डर, संजय पावले, प्रवीण भाटले यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती
रमाकांत कोंडुसकर म्हणाले, हिंदू धर्म आणि भारत मातेसाठी दिलेल्या महापुरुषांचे स्मरण व्हावे, यासाठी पुतळ्यांची उभारणी केली जात आहे. धर्मवीर संभाजी राजे यांचे कार्य मोठे आहे. त्यामुळे त्यांनाच धर्मवीर ही पदवी मिळाली आहे. समाजात वाढत चाललेल्या औरंगजेबांना रोखण्याची तयारी प्रत्येक युवकांनी ठेवण्याचे आवाहन केले.
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवण्याचे काम केले. त्यामुळे त्यांचे स्मरण करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
ऍड. निलेश हत्ती यांनी, युवा पिढीने महापुरुषांचे गुण अंगीकारले पाहिजेत. निपाणी शहरात संभाजी महाराजांचा हा दुसरा पुतळा बसविल्याची अभिमानास्पद असल्याचे सांगितले. श्रेयस आंबले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुनील दळवी, दीपक खापे, लौकिक कुंडले, कुबेर नाईक, सुमित सपाटे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार झाला.
यावेळी नगरसेवक संजय सांगावकर, रणजीत देसाई, संजय पाटील, प्रवीण भाटले, रवी नाईक, सतीश इंगळे, आकाश भोसले, विनायक वडे, संतोष माने यांच्यासह छत्रपती श्री संभाजीनगर तरुण मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.