निपाणी (वार्ता) : इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटीज ग्रुप ऑफ इंडिया हा देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाशी जोडला गेलेला स्वयंप्रेरित शिक्षकांचा समूह आहे .त्यांच्या छत्तीसगड विभागातर्फे राष्ट्रीय नवाचारी शिक्षा रत्न २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक राज्यातून निपाणी येथील संभाजीनगर प्राथमिक शाळेचे शिक्षक एस. एम. नदाफ यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांना वरील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
एस. एम. नदाफ हे विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या शाळेत मुलांच्या विकासासाठी राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आल होता. देशभरातील शिक्षकांच्या समूहाचे प्रमुख संजीव कुमार सूर्यवंशी आहेत. कर्नाटक राज्यातील शिक्षकांच्या निवडीसाठीच्या मुलाखती रमेश मनगुते व शबाना परवीन यांनी पुरस्काराची निवड करण्यासाठी गुगल फॉर्मच्या माध्यमातून माहिती मागविण्यात आली. देशभरातून ७०० पेक्षा जास्त शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याची पडताळणी करून ११५ शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यामध्ये एस. एम. नदाफ यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात झाली. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळे तर्फे मुख्याध्यापक सी. एम. सुगते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ए. एस. तावदारे, के. डी. खाडे, के. बी. शितोळे, एम. ए. पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. नदाफ यांना गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, बीआरसी प्रमुख आर. ए. कागे त्यांच्यासह शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले.