निपाणी (वार्ता) : येथील माजी नगराध्यक्ष दिवंगत दौलतराव पाटील स्मृती चषक २०२४ क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये चिखली येथील परमाने क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेमध्ये ३२ संघानी सहभाग घेतला होता.
स्पर्धेतील उपांत्य फेरीत कुन्नूर स्पोर्ट्स, कुरली स्पोर्ट्स, चिखली परमने ट्रेडर्स व श्रीपेवाडी स्पोर्ट्स या चार संघानी धडक मारली. यामध्ये पहिल्या उपांत्य फेरी श्रीपेवाडी विरुद्ध कुन्नूर स्पोर्ट्स यांच्या मध्ये झाली. दुसरा उपांत्य फेरीचा सामना कुर्ली स्पोर्ट्स विरुद्ध चिखली परमने ट्रेडर्स यांच्यामध्ये झाला. श्रीपेवाडी व चिखली परमने या दोन संघांनी अंतिम फेरी गाठली. यामध्ये परमाने ट्रेडर्स चिखली हा संघ माजी नगराध्यक्ष दौलतराव पाटील स्मृती चषकाचा मानकरी ठरला.
अंतिम सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार सुशील कांबळे परमने ट्रेडर्स या संघातील खेळाडूला गेला.
मॅन ऑफ द सिरीज श्रीपेवाडी या संघातील युवराज पाटील याला मिळाला. बेस्ट बॅट्समन म्हणून संदीप मकवाना,
बेस्ट बॉलर म्हणून कुरली संघाचा सागर कमते याला गौरविण्यात आले.
विजेत्या संघांना सुजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते निकु पाटील, धनाजी भाटले, रमेश भोईटे, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब खोत, राजू पाटील, महेश जाधव, संजय मोरे, प्रमोद पाटील, सुधाकर सोनाळकर, निलेश येरूडकर, दयानंद स्वामी, बाळासाहेब पोवार, विनोद बल्लारी, सुनील हिरूगडे, अरुण आवळेकर, शशांक पाटील व मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.