‘महात्मा बसवेश्वर’चा वर्धापन दिन
निपाणी (वार्ता) : महात्मा बसवेश्वरांच्या शिकवणीनुसार संस्थेचा कारभार सुरू आहे. आर्थिक व्यवहाराबरोबरच समाजसेवा आणि अध्यात्माला महत्व दिले आहे. नवीन युवकांना प्रशिक्षण देऊन कर्मचारी भरती केली जात आहे. शहरासह ग्रामीण भागातील सर्वच शाखामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. संस्थेकडे ५०० कोटी रुपयांच्या ठेवी असून १ हजार कोटीच्या ठेवीचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी दिली. संस्थेच्या ३४ व्या वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात १०० जणांनी रक्तदान केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.
ईश्वर स्वामी यांनी, सहकार क्षेत्रात मन मजबूत करून कारभार केल्याने संस्थेची प्रगती झाली आहे. जीवनात पैशाला महत्त्व असून त्याचा दुरुपयोग टाळण्याचे आवाहन केले. सहकाररत्न उत्तम पाटील, प्राणलिंग स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले.
गणेश वंदना, बसवचन सादर झाले. संचालक श्रीकांत परमणे यांनी प्रास्ताविक केले. सीईओ एस. के. आदन्नावर, आणि नवीन निर्मळे यांनी आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. दिलीप गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसाठी दिलेल्या सवलतींची माहिती दिली.
कार्यक्रमास उपाध्यक्ष सुरेश शेट्टी, डॉ. एस. आर. पाटील, किशोर बाली, प्रताप पट्टणशेट्टी, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील,
रवींद्र शेट्टी, संजय मोळवाडे, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सदानंद दुमाले, प्रताप मेत्राणी, निंगाप्पा धनगर, दिनेश पाटील, चंद्रकांत कोठीवाले, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, प्रसन्न कुमार गुजर, प्रकाश शहा, विजय मेत्राणी यांच्यासह विविध संस्था व शाखांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. एम. बी. बडीगेर यांनी आभार मानले.