बेळगाव : मराठी भाषेचा सुगंध हा न संपणारा व कायमस्वरूपी दरवळणारा आहे. तेव्हा आपल्या दैदीप्यमान, श्रीमंत मराठी भाषेचे अनंत पैलू जमतील तसे व जमतील तेव्हा उलघडत राहावे. व मराठीचा आनंद लुटत राहावा व तो मराठी जनांना देत राहावा.
व हे कार्य अहोरात्र करत आहे. मच्छे येथील श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय. वाचन चळवळ व वाचक वाढीसाठी वाचनालयातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. स्पर्धा परीक्षा, दर शुक्रवारी वाचलेल्या पुस्तकावर परिसंवाद, असे बरेच कार्यक्रम राबवून मराठी संवर्धनाचे काम केले जाते.यंदाचे सूवर्ण महोत्सवी वर्ष असून वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सायं. 4 वाजता. पहिल्या सत्रात -शालेय विद्यार्थी मराठी गौरवपर सांस्कृतिक कार्यक्रम करतील.
दुसऱ्या सत्रात सौ. सरिता मोटराचे -गुरव यांचे “हसत खेळत मराठी वाढवूया -मराठी शिकूया” या विषयावर व्यक्तिमत्व विकासासाठी व्याख्यान होईल.
तिसऱ्या सत्रात -मराठा मंडळ संचलित कान्सूली विद्यालयाचे शिक्षक विनायक चौगुले ह्यांचे “माझ्या माय मराठीचा प्रवास “ह्या विषयावर व्याख्यान होणार आहे. याप्रसंगी वाचनालयाचे संस्थापक सदस्य अनंत लाड व विद्यमान अध्यक्ष संतोष जैनोजी हेही उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे संचालक परिश्रम घेत आहेत.