निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा अधिकृत समिती निपाणी विभागाच्या वतीने आज तहसीलदार निपाणी यांना कन्नडसक्तीबाबत निवेदन दिले. धारवाड खंडपिठाच्या व केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या निकालानुसार वादग्रस्त सीमाभागातील मराठी भाषिक व्यापाऱ्याना आस्थापनेवर त्यांच्या भाषेतुन बोर्ड लावण्याचा कायदेशीर अधिकार दिलेले आहेत. सध्या कन्नडची सक्ती सुरु आहे ती तात्काळ थांबविण्यात यावी, निपाणी तालुक्यातील व्यवहार सर्व मराठी भाषेतुन होतात मूळची भाषा मातृभाषा मराठी आहे, त्यामुळे कन्नडची सक्ती भारतीय संविधानाने अधिकार मराठी अल्पसंख्याकांना दिले आहेत त्याचाच वापर होणार, निवेदनासोबत धारवाड खंडपीठचा व केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या निकालाच्या प्रति जोडल्या आहेत. यावेळी निवेदन देताना नायब तहसीलदार मृत्युन्जय डंगी, ग्रामसहाय्य्क जितू पाटील यांनी स्वीकारले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा अधिकृत समिती निपाणी अध्यक्ष बंडा पाटील, प्रा. डॉ. भरत पाटील, सौरभ केसरकर, रामचंद्र केसरकर (संधी) इत्यादी उपस्थित होते.