ममदापुरात हरिनाम सप्ताहाची सांगता
निपाणी (वार्ता) : ‘माऊली माऊली’चा गजर, वारकऱ्यांचा उत्साह आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ममदापूर (के.एल.) येथे आयोजित हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. हरिनाम सप्ताहात आठवडाभर प्रवचन कीर्तन भजन असे विविध कार्यक्रम पार पडले.
शितोळे सरकार अंकलीकर यांच्या अश्वाचे बोरगाव येथील सहकारत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते पूजन झाले. त्यानंतर उभा, आडवा अश्व रिंगण सोहळा झाला. हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील वारकरी व भाविकांनी गर्दी केली होती. निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, उद्योजक रोहन साळवे यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप झाले.
यावेळी निरंजन पाटील (सरकार) महारुद्र स्वामी, धोंडीराम मगदूम- महाराज, कोल्हापूरचे उद्योजक सुखदेव साळुंखे, बालाजी मगदूम, गजानन कावडकर, रावसाहेब गोरवाडे, प्रकाश पाटील, मधुकर उत्तूरे, पांडुरंग हरेल, मोहन पाटील, आनंदा केनवडे, शेखर पाटील, बाळासाहेब गोरवाडे, संदिप तोडकर, विकास पाटील, नगरसेवक संजय सांगावकर, इम्रान मकानदार, सचिन पोवार, प्रकाश गायकवाड, शिरीष कमते, दीपक वळीवडे, यांच्यासह परिसरातील वारकरी, माळकरी, भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.