बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक-महाराष्ट्र सीमा चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. सोमवारी मध्यरात्री निवडणूक कर्मचाऱ्यांनी बेळगाव तालुक्यातील बाची चेकपोस्टवर कागदपत्रांशिवाय वाहतूक होत असलेले ६.६५ लाख रुपये जप्त केले.
या प्रकरणी अमूल विद्याधर यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
निवडणूक जवळ आल्याने बेळगाव जिल्ह्यातील चेकपोस्टवर कडेकोट बंदोबस्त सुरू झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातून अन्य राज्यांत जाणाऱ्या आणि त्या राज्यांतून बेळगावात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. निवडणूक जवळ आल्याने अवैध वाहतूक होऊ शकते या संशयाने पोलिस आता प्रत्येक वाहनावर करडी नजर ठेवून आहेत.