बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कलखांब या एका छोट्याशा खेड्यातील विद्यार्थी राहुल जयवंत पाटील याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करून बेलगावकरांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.
सुरवातीपासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून परिचित असलेला राहुल याने वनिता विद्यालय हायस्कूलमधून दहावी झाल्यानंतर आरएलएस कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण झाला त्यानंतर आरव्ही कॉलेज, बेंगलोर मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये विशेष प्रावीण्य मिळविले. त्याचबरोबर त्याने एनडीएमध्ये पण आपली चुणूक दाखवून उत्तीर्ण झाला होता पण घरच्यांच्या इच्छेखातर त्याने त्यावर पाणी सोडून युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्या परीक्षेत सुद्धा तो आज उत्तीर्ण झाला असून ही बेलगावकारांच्यासाठी मानाची गोष्ट आहे.
एका खेडेगावातील मराठी मुलगा ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्याचे सगळीकडे कौतुक होत आहे.