बेळगाव : श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळा मेन रोड समर्थ नगर येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी दिनांक 15/4/2024 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता या दिंडी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. श्री कपिलेश्वर देवस्थान येथुन समर्थ नगर पर्यंत ही दिंडी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दिंडी मिरवणुकची पुजा राजाराम पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात अली. छत्रपती श्री शिवाजी महाराज व श्री विठ्ठल मूर्ती तसेच चित्ररथाची पुजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
ह भ प श्री राजु गुंडू जायनाचे (धामणे) यांच्या अधिष्ठान खाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याला चालना देण्यात आली. यावेळी सर्व प्रमुख पाहुण्याचे पारायण मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. तसेच या अडीच दिवसाच्या पारायण सोहळ्याचे बेळगावकरांनी लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे. यावेळी दिंडी मिरवणुकीच्या अग्रभागी महिलांनी मोठ्या संख्येने डोक्यावर कलश व तुळस घेऊन विठुरायाच्या भजन मध्ये भक्तिभावाने दंग झाले होते. तसेच जय किसान भाजी मार्केटचे भजनी मंडळाचे वारकरी मोठ्या संख्येने दिंडी मिरवणुकमध्ये सहभागी झाले होते.
यावेळी बालगोपाल विठू रायच्या वेशभूषेत येऊन सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते. यावेळी सर्व मलिकार्जुन नगर, समर्थ नगर मधील युवक मंडळ, महिला मंडळ, बालगोपाळ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.