निपाणी (वार्ता) : येथील जत्राट वेसमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात विवेक मोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवून ११ हजाराचे बक्षीस पटकावले.तर महिला गटात वैष्णवी रावळ हिने प्रथम क्रमांक पटकावून २००१ रुपयांचे बक्षीस मिळवले.
सामाजिक कार्यकर्ते जीवन घस्ते आणि शुभम माने यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
पुरुष गटात महादेव कोळेकर, प्रथमेश परमकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाची ७००१, ५००१ रुपयांची बक्षिसे मिळवली. महिला गटात गौरी भंडारे, स्वरा शिंपूकडे यांनी द्वितीय व तृतीय क्रमांकाची १५०१, १००१ रुपयांची बक्षिसे पटकाविली. स्पर्धेसाठी ११ किलोमीटरचे अंतर ठेवण्यात आले होते.
वक्तृत्व स्पर्धेत अक्षरा मधाळे, ऋतुजा कांबळे व अभिलाषासनदी वेदांत सचीन कांबळे यांनी क्रमांक पटकावले. रांगोळी सार्धेत पुजा कांबळे, प्रथमेश कांबळे, अभिलाषा सनदी, संस्कृती कांबळे, राधीनी कांबळे अस्मिता घस्ते यांनी बक्षीसे मिळवली. निबंध स्पर्धेत अभिलाषा सनदी, ऋतुजा कांबळे, गायत्री मधाळे, प्रतिक्षा कांबळे, अक्षरा मधाळे व सन्मती जिरगे यांनी बक्षीस पटकावली. सर्व विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानपत्र देण्यात आले.
यावेळी अमित कांबळे, लोकेश घस्ते, विजय कांबळे, आरेश सनदी, जीवन घस्ते, रमेश मधाळे, जीवन कांबळे, उत्तम वाळके, सुरज कांबळे, नामदेव कांबळे, श्रऋषिकेश कांबळे, अविनाश वाळके, शंकर सोनटक्के, राज कांबळे, रोहित मड्डे, अशिष जाधव, ऋतिक कांबळे, रोहन मधाळे, विशाल कांबळे, शिवम जाधव, राजरत्न कांबळे, सोहेल कांबळे, प्रतिक कांबळे, संतोष राबते मनोज सावंत शुभम कांबळे, ओंकार कांबळे, रोहित कांबळे, अमित जाधव, रोहन किसन कांबळे, संदीप माने, संस्कार कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.