चिकोडी : चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी गुरुवारी (दि. १८) साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी नेते व लोकप्रतिनिधी हजर राहणार आहेत. सध्या उष्मा वाढल्याने कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ शकतो, अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे. त्यामुळे, त्यांच्या मार्गदर्शनानुसार साध्या पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे प्रियांका यांनी स्पष्ट केले आहे. प्रियांका प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. ते आणि त्यांचे भाऊ राहुल यमकनमर्डी ते अथणी या भागात प्रचार करत आहेत.