निपाणी (वार्ता) : येथील नगरसेविका उपासना गारवे यांना ‘आदर्श नगरसेविका’ पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यांच्या सहभागाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या महाविद्यालयात कर्तव्यदक्ष भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षणाधिकारी, राजकीय नेते व माठाधिशांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार रविवारी (ता.२६) गोवा येथे प्रदान करण्यात येणार आहे. विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, मैसूर फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार व भारत सरकारचे अभिनंदन पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.